जय तू जय देवा सदाशिवा आरती
जय तू जय देवा सदाशिवा आरती महादेवा, जय तू जय देवा ।।धृ ।।
महादेव निघाले शिकारी ढवळ्या नंद्यावरी, महादेव निघाले ।।
जीनबा त्याहीचा सोनेरी लगाम कारागिरी, जय तू जय देवा ।।
जय तू जय देवा सदाशिवा आरती महादेवा, जय तू जय देवा ।।धृ ।।
चार बाई सडका सोडोनी हिंडता राणोरानी, चार बाई सडका ।।
गीरजा एकली गुंफेत उदास तिचे चित्त, गिरजा एकली ।।
तेथे देव नांदतो हा माळी, धनाचा गवळी, तेथे देव नांदतो ।।
धन गवळी धनात, मोतिशेष पाण्यात, धन गवळी धनात ।।
धन तू धनाचा, धन गवळी, गायी म्हशीं वाडे भरी, धन तू धनाचा ।।
गायी म्हशीन भर वाडे भक्त देतील झाडे, गायी म्हशीन ।।
काशी आमुची गुरु माय वंदीन तिचे पाय, काशी आमुची ।।
धु धु नागाचा धूनकार गरजले अंबर, धु धु नागाचा ।।
आडवी आहेसे बेल नदी, सूर्यासमोर वाहे, आडवी आहेसे ।।
पांचा दिवसाची पंचमी आली हो नागेश्वरा, पांचा दिवसाची ।।
फुलोरे बांधले अवसरी, आनंद घरोघरी, फुलोरे बांधले ।।
कापूर जळतो मणावरी नागाच्या दरबारी, कापूर जळतो ।।
म्होरका पूरभा स्वयंवर देवाच्या वाटेवर, म्होरका पूरभा ।।
ओटा बांधला चौफेर, मंधी वडाचे झाड, ओटा बांधला ।।
जय तू जय देवा सदाशिवा आरती महादेवा, जय तू जय देवा ।।धृ ।।
Very nice 🤗😀
ReplyDeleteThank u🙏
DeleteNice masi
ReplyDeleteThank u🙏
DeleteAwesome
ReplyDeleteThank u🙏
Delete🙏🙏🙏👍
ReplyDeleteThank u🙏
DeleteNice👍
ReplyDeleteThank u🙏
DeleteKeep it up 👍
ReplyDeleteThank u🙏
Delete